ये जिंदगी की रेस है... सलमानच्या 'रेस 3'चा ट्रेलर रिलीज
एबीपी माझा वेब टीम | 15 May 2018 08:17 PM (IST)
सलमानसोबत अनिल कपूर मुख्य भूमिकेत असून बॉबी देओल मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन करत आहे.
मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या बहुप्रतीक्षित 'रेस 3' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. थरारक अॅक्शन आणि चटकदार संवादांमुळे 'रेस 3'च्या ट्रेलरवर चाहत्यांच्या उड्या पडत आहेत. 'ये रेस जिंदगी की रेस है, किसी की जिंदगी लेकर ही खत्म होगी' या सलमानच्या डायलॉगने ट्रेलरला सुरुवात होते. 'परिवार के लिए किसी की जान भी लेनी पड़ेगी तो पीछे नहीं हटेंगे.' असं सलमान म्हणताच 'गुस्से में लिया गया फैसला हमेशा नुकसान पहुंचाता है, इसलिए मैंने पहले फैसला लिया और अब गुस्सा हो रहा हूं.' असं अनिल कपूर म्हणताना दिसतो. सलमान खानच्या हाती चक्क रॉकेट लाँचर दिसत आहे. सलमानसोबत अनिल कपूर मुख्य भूमिकेत असून बॉबी देओल मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन करत आहे. जॅकलिन फर्नांडिस आणि डेझी शाह या हिरोईन्सच्या वाट्यालाही अनेक साहसी दृश्यं आहेत. साकिब सलीम आणि फ्रेडी दारुवालाही सिनेमात झळकणार आहेत. ईदच्या मुहूर्तावर म्हणजे 15 जूनला रेस 3 प्रदर्शित होणार आहे. पाहा व्हिडिओ :