Bollywood SPY Universe : चित्रपटाच्या फ्रेंचायझीचा सध्या बॉलिवूडमध्ये ट्रेंड असल्याचं दिसतंय. चित्रपट आणि त्यांचे सीक्वेल यांचं वेड आता युनिव्हर्सपर्यंत पोहोचलं आहे. हॉलिवूडप्रमाणे बॉलिवूडमध्येही सुपरहिरो आणि स्पाय युनिव्हर्स असं समीकरण पाहायला मिळत आहे. सलमान खान, शाहरुख खान आणि ह्रतिक रोशन हे बॉलिवूड सुपरस्टार्स YRF स्पाय युनिव्हर्सचा भाग आहेत. YRF स्पाय युनिव्हर्सची सुरुवात 2012 मध्ये एक था टायगर चित्रपटापासून झाली होती. यशराज फिल्मचा टायगर चित्रपट पुढे जाऊन स्पाय युनिव्हर्सचा पाया रचेल, अशी कुणालाही कल्पना नव्हती. 2012 नंतर 2024 पर्यंत स्पाय युनिव्हर्सचा मोठा विस्तार झाला आहे. यामध्ये 2023 मध्ये आलेली पठाण शेवटची चित्रपट ठरला. आता या स्पाय युनिव्हर्समधील आगामी चित्रपटाची घोषणा झाली आहे.
YRF स्पाय युनिव्हर्समधील महागडा अभिनेता कोण?
YRF ने स्पाय युनिव्हर्स आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. 2012 पासून आतापर्यंत यशराज फिल्मच्या स्पाय युनिव्हर्समध्ये पाच चित्रपट बनले, जे बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. यामध्ये एक था टायगर, टायगर जिंदा है, टायगर 3 आहेत. याशिवाय शाहरुखचा पठाण आणि ह्रतिक रोशनचा वॉर चित्रपट स्पाय युनिव्हर्समधीलच आहे. आता आगामी काळात स्पाय युनिव्हर्समध्ये दमदार चित्रपट पाहायला मिळणार आहे. YRF स्पाय युनिव्हर्समध्ये येत्या काळात वॉर 2, आलिया भट्ट आणि शरवरी वाघचा 'अल्फा' आणि 'टायगर वर्सेज पठाण' हे चित्रपट पाहायला मिळणार आहेत.
सलमान खान, शाहरुख खान की ह्रतिक रोशन?
YRF स्पाय युनिव्हर्समध्ये सध्या सलमान खान, शाहरुख खान आणि हृतिक रोशन हे स्टार्स आहेत. त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली. स्पाय युनिव्हर्स कोणता हिरो सर्वात महागडा आहे, यशराजने आतापर्यंत कोणत्या अभिनेत्याला सर्वाधिक फी दिली आहे? जाणून घ्या.
हृतिक रोशन
यशराज फिल्म्सने 2019 मध्ये ह्रतिक रोशनला वॉर चित्रपटासाठी 48 कोटी रुपये दिले होते. वॉर 2 चित्रपटासाठी ह्रतिकने किती मानधन घेतलं याबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही. मात्र त्याच्या फीमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे.
सलमान खान
सलमान खानच्या टायगर फ्रँचायझीचा नवीन चित्रपट टायगर 3 आहे. टायगर 3 चित्रपट 2023 मध्ये रिलीज झाला. मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटासाठी निर्मात्यांनी सलमान खानला जवळपास 100 कोटी फी दिली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केलं होतं.
शाहरुख खान
2018 मध्ये शाहरुख खान 'झिरो' चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट फ्लॉप झाला होता. यानंतर, तो बराच वेळ गेला आणि 2023 मध्ये स्पाय युनिव्हर्सच्या पठाणमध्ये गुप्तहेर म्हणून दिसला. पठाण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली. रिपोर्टनुसार, शाहरुखने पठाण चित्रपटासाठी एक रुपयाही घेतला नाही. कारण त्याने चित्रपटाच्या नफ्यात 60 टक्के हिस्सा घेण्याचा करार केला होता. पठाण चित्रपटाचे बजेट 270 कोटी रुपये होते. निर्मात्यांनी 333 कोटी रुपये कमावले आणि शाहरुखला 60 टक्के हिस्सा म्हणजेच सुमारे 200 कोटी रुपये देण्यात आले. यानुसार, शाहरुख खान YRF स्पाय युनिव्हर्समधील आतापर्यंतचा सर्वात महागडा अभिनेता आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :