Salman Khan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. त्याचा 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सलमान खानने रजत शर्मा यांच्या 'आप की अदालत' या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमामध्ये सलमानला अनेक प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांना सलमाननं दिलेल्या उत्तरांनी अनेकांचे लक्ष वेधले. यावेळी सलमानला महिलांच्या कपड्यांबाबत देखील प्रश्न विचारण्यात आला.
महिलांच्या कपड्यांबाबत सलमानला विचारण्यात आला प्रश्न
'सलमान खान डबल स्टँडर्ड पद्धतीनं वागतो.' असा आरोप सलमानवर 'आप की अदालत' या कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी रजन शर्मा म्हणाले, 'किसी का भाई किसी की जान या चित्रपटाच्या सेटवरील अभिनेत्रींना तू सांगितलं होतं की, डिसेंट कपडे परिधान करा, ड्रेसची नेकलाइन ठिक असावी.' यावर सलमाननं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.
काय म्हणाला सलमान?
रजन शर्मा यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत सलमान म्हणाला, 'अनेक लोक त्यांच्या कुटुंबासोबत चित्रपट बघायला जातात. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. यामध्ये डबल स्टँडर्ड नाही काही. मला वाटतं, महिलांचे शरीर मौल्यवान आहे. ते जेवढे झाकलेलं असेल, तेवढं चांगलं आहे. मुलं ज्या प्रकारे मुलींकडे बघतात, ते मला आवडत नाही.'
ओटीटीवरील कटेंन्टबाबत देखील सलमाननं या मुलाखतीमध्ये सांगितलं. सलमान म्हणाला, 'ओटीटीवरील कंटेन्टला कोणतेही सर्टिफिकेट नाहीये. ओटीटीवर देखील सेंन्सॉर असावा. '
सलमानचे आगामी चित्रपट
काही दिवसांपूर्वी सलमानचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट लवकरच 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असं म्हटलं जात आहे. या चित्रपटामधील 'छोटू मोटू' ,'येंतम्मा', 'नय्यो लगदा', 'बिल्ली बिल्ली', 'बथुकम्मा' आणि 'जी रहे थे हम' या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. आता सलमानच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
सलमानचा 'टायगर-3' हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. किक-2 तसेच नो एन्ट्रीच्या सिक्वेलमधून सलमान प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असंही म्हटलं जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :