Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Ponniyin Selvan 2 Box Office Collection : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Jaan) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण कमाईच्या बाबतीत हा सिनेमा मागे पडला आहे. 'पोन्नियिन सेल्वन 2' (Ponniyin Selvan 2) हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर 'किसी का भाई किसी की जान'चा खेळ खल्लास झाला आहे.


'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला होता. या सिनेमाच्या माध्यमातून सलमानने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. पण तरीही बॉक्स ऑफिसवर मात्र रेकॉर्डब्रेक कमाई करण्यात तो मागे पडला. रिलीजच्या आठव्याच दिवशी बॉक्स ऑफिसवरचा त्याचा खेळ खल्लास झाला आहे. 


'किसी का भाई किसी की जान' लवकरच पार करणार 100 कोटींचा टप्पा 


'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाने रिलीजच्या आठव्या दिवशी फक्त 3.5 कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत या सिनेमाने फक्त 92.15 कोटींचा गल्ला जमवला आहे. आता वीकेंडला हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा पार करू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. 


बॉक्स ऑफिसवर 'पोन्नियिन सेल्वन 2'ने किती कमाई केली? (Ponniyin Selvan 2 Box Office Collection)


दुसरीकडे 'पोन्नियिन सेल्वन 2' (Ponniyin Selvan 2) या सिनेमाने ओपनिंग डेलाच बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवली आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने 32 कोटींची कमाई केली आहे. पण 'पोन्नियिन सेल्वन 2' हा सिनेमा आणखी कमाई करू शकतो, असा अंदाज होता. 


'पोन्नियिन सेल्वन 2' हा सिनेमा तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी भाषेत प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात चियान विक्रम, ऐश्वर्या राय, कार्थी, तृषा, जयम रवी, ऐश्वर्या लक्ष्मी आणि शोभिता धूलिपाला हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'पोन्नियिन सेल्वन 2' शाहरुखच्या 'पठाण'चा रेकॉर्ड मोडणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 






संबंधित बातम्या


KKBKKJ Box Office Collection Day 6: सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान' च्या कमाईत घसरण; जाणून घ्या सहाव्या दिवसाचं कलेक्शन