Salman Khan : धमकी, घरावरील गोळीबार या सगळ्या प्रकारामुळे अभिनेता सलमान खान (Salman Khan) मागील काही दिवसांपासून चर्चेत आला आहे. त्यातच आता महाबळेश्वर पोहचला आहे. सातारा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं गाव. त्यातच सलमान हा महाबळेश्वरमध्ये पोहचल्यानंतर तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या दरे गावी देखील जाणार होता. पण दाट धुक्यामुळे तो मुख्यमंत्र्यांच्या गावी पोहचू शकला नाही. 


सलमानला मिळालेल्या धमकीमुळे त्याला खास पोलीस संरक्षण पुरवण्यात आले आहे. पोलिसांचाही तो ताफा त्याच्या गाड्यांच्या ताफ्यासोबत आहे. विशेष म्हणजे सलमान खान हा महाबळेश्वरातील वाधवानच्या बंगल्यात रात्री वास्तव्यास आहे. कोरोना काळात वाधवान हे नाव बरंच चर्चेत आलं होतं. 


वाधवन प्रकरण नेमकं काय?


वाधवानच्या दोन भावांना सीबीआयची यंत्रणा शोधत होती. त्याचवेळी करोना काळात हे दोघेही कडक लॉकडाऊन असताना, पोलीस मंत्रालयातील अभिनव गुप्ता यांच्या खास पत्राने ते मुंबई येथून महाबळेश्वरला आला. एबीपी माझाने हा सर्व प्रकार समोर आणलाही होता. त्यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अभिनव गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं. 


त्यानंतर वाधवान कुटुंबाला 15 दिवसांसाठी पाचगणी येथील एका शाळेत कॉरंटाईन करण्यात आलं होतं. तो कालावधी संपल्यानंतर दोन्ही भावांना सीबीआयने ताब्यात घेतलं आणि अटक केली. याच वाधवान बंगल्यात कालपासून म्हणजे बुधवार 19 जूनपासून वास्तव्यास आहे. वाधवान यांच्या याच बंगल्याच्या आत दोन बंगले आहेत. यातील एक बंगला सीबीआयने सील केला आहे, तर दुसरा बंगला हा खुला आहे. 


या बंगल्यात कोट्यवधी रुपयांचे पेटिंगही होते, जे सीबीआयने जप्त केले होते. वाधवान जेव्हा महाबळेश्वर आला तेव्हा दोन्ही भावंड आलिशान गाड्या घेऊन महाबळेश्वरला आले होते. त्या सातही गाड्या महाबळेश्वर पोलिसांना जप्त केल्या. आजही त्या गाड्या पाचगणी पोलीस स्थानकाच्या आवारतच आहेत. 


शुटींगसाठी सलमान महाबळेश्वरमध्ये 


दरम्यान बॉलीवूडचा भाईजान हा आगामी सिनेमाच्या शुटींगसाठी महाबळेश्वरमध्ये पोहचला असल्याची माहिती मिळाली आहे. पण वाधवानच्या बंगल्यात वास्तव्य केल्यामुळे साऱ्यांच्याच भुवया उंचावल्यात. त्यामुळे सलमानने वास्तव्यासाठी हाच बंगला का निवडला हे पाहणं गरजेचं ठरेल.     


वाधवनचा नेमका वाद काय?


डीएचएफएल प्रकरणात वाधवान बंधू वादाच्या अडकले. 17 बँकांचे 34 हजार कोटी रुपये बुडवल्याचा आरोप या दोन्ही भावंडांवर करण्यात आला आहे. त्यानंतर वाधवान बंधूंना सीबीआयकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये या भावंडांचा मुंबई-महाबळेश्वर प्रवास वादात आला होता. 
                    


ही बातमी वाचा : 


Gaurav More : सिंह फक्त जंगलातच राजा शोभून दिसतो, सर्कसमध्ये नाही; हिंदी शोमुळे गौरव मोरेवर प्रेक्षक नाराज