सलमानकडून बिपाशाला 10 कोटींचं अलिशान अपार्टमेंट गिफ्ट?
एबीपी माझा वेब टीम | 18 Jun 2016 03:48 PM (IST)
मुंबई : बॉलिवूडमध्ये कायमच उलट-सुलट चर्चा सुरु असतात. सध्या चर्चा आहे सलमान खान आणि बिपाशा बासू यांच्याबाबत. सलमानने बिपाशाला वेडिंग गिफ्ट म्हणून 10 कोटींचं अलिशन अपार्टमेंट दिल्याची चर्चा आहे. बिपाशाच्या रिसेप्शनवेळी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज उपस्थित होते. यामध्ये अमिताभ बच्चन यांच्यापासून अभिनेता सलमान खानही सहभागी झाला होता. सलमान आणि बिपाशा यांच्यात चांगली मैत्री आहे. त्यामुळे अर्थात मीडियाची नजरही या दोघांवर होती. आता या दोघांबाबत एक चर्चा सुरु झालीय की, सलमानने बिपाशाला वेडिंग गिफ्ट म्हणून 10 लाखांचं अलिशान अपार्टमेंट दिलं. बिपाशाने या चर्चांवर नाराजी व्यक्त करत ट्विटरवरुन स्पष्टीकरण दिले आहे. मी कुणाकडून अशाप्रकारे गिफ्टा का घेईन, असा सवाल करत या चर्चा बिपाशाने फेटाळल्या आहेत.