वाद आणि पायरसीनंतर 'उडता पंजाब'च्या पहिल्या दिवसाची कमाई...
एबीपी माझा वेब टीम | 18 Jun 2016 10:11 AM (IST)
मुंबई : आधी सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या कट्सवरुन वाद आणि त्यानंतर पायरसीचं ग्रहण लागलेला 'उडता पंजाब' शुक्रवारी देशभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. मात्र प्रदर्शनापूर्वीच्या वादाचा फायदा उडता पंजाबला झालेला दिसत आहे. कारण सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी 10.05 कोटींची दमदार आणि आश्वासक कमाई केली आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरन आदर्श यांनी 'उडता पंजाब'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी ट्विटरवर माहिती दिली. तसंच हा ट्रेण्ड कायम राहिला तर या विकेण्डला 'उडता पंजाब'ची बॉक्स ऑफिसवरील कामगिरी चांगली राहिल, असा विश्वास तरन आदर्श यांनी व्यक्त केला. https://twitter.com/taran_adarsh/status/744069481102716930 https://twitter.com/taran_adarsh/status/744069584911761408 महत्त्वाचं म्हणजे सिनेमाने उत्तर भारतात, विशेषत: दिल्ली आणि पंजाबमध्ये चांगली कमाई केली आहे. यंदा पहिल्याच दिवशी 10 कोटींपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये उडता पंजाब पाचव्या क्रमांकावर आहे. https://twitter.com/taran_adarsh/status/744069689463181312 संबंधित बातम्या