काय आहे प्रकरण?
सलमान खाननं त्याच्या शेजाऱ्याविरोधात म्हणजेच केतन कक्कड विरोधात मानहानीचा दावा दाखल केला. सोशल मीडियावर सलमान खानचे फोटो पोस्ट केल्यामुळे त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना त्रास झाला यावर बंदी घातली पाहिजे, असं या तक्रारीमध्ये सलमाननं म्हटलं
कक्कड यांचा व्हिडीओ हा काल्पनिक असून केवळ बदनामीकारकच नाही तर सलमान खानविरोधात लोकांमध्ये जातीयदृष्ट्या तेढ भडकवणाराही आहे, असा दावा सलमानच्यावतीनं जेष्ठ वकील रवी कदम यांनी केला. तसेच अल्पसंख्याक समुदायाचा सदस्य असलेला सलमान त्याच्या फार्महाऊसजवळील गणेश मंदिर बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचंही कक्कड म्हणाले आहेत. एकीकडे अयोध्येत मंदिर उभाण्यासाठी 500 वर्षे लागली तर इथे सलमान खान एक गणेश मंदिर बंद करण्याचा प्रयत्न करत आहे असा उल्लेख करत कक्कड यांनी सलमानची तुलना थेट बाबर आणि औरंगजेबशी केल्याचा आरोप कदम यांनी केला. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर शेकडो लोकं सलमानविरोधात सोशल मीडियावर शेरेबाजी करत असल्याचंही त्यांनी कोर्टाला सांगितलं.
सलमानचे आगामी चित्रपट
‘पठाण’ या चित्रपटामध्ये सलमान कॅमिओ करणार आहे. ‘टायगर 3’, 'किसी का भाई किसी की जान' हे त्याचे आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या:
- Salman Khan : सलमान खानकडून पनवेलमधील शेजाऱ्याविरुद्ध तक्रार; सिटी सिव्हील कोर्टात खटला दाखल
- पनवेलमधील शेजाऱ्याविरोधात सलमान खान आता हायकोर्टात, सत्र न्यायालयानं दिलासा नाकारल्याच्या निर्णयाला आव्हान