Vivek Agnihotri : चित्रपट निर्माता-दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. प्रत्येक मुद्द्यांवर बेधडकपणे आपले मत मांडण्यासाठी ते ओळखले जातात. आता 'द कश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. विवेक अग्निहोत्री यांनी नुकतीच आमिर खानच्या (Aamir Khan) नवीन जाहिरातीवर सडकून टीका केली आहे. ‘सामाजिक परंपरा बदलण्याच्या नावाखाली मूर्खपणाच्या गोष्टी दाखवल्या जात आहेत’, असे म्हणत विवेक अग्निहोत्री यांनी या जाहिरातीचा व्हिडीओ शेअर करून निर्मात्यांना फटकारले आहे.


बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) त्यांच्या नव्या जाहिरातीमुळे चर्चेत आहेत. ही जाहिरात एका बँकेची आहे, ज्यामुळे दोन्ही कलाकार ट्रोल देखील होत आहेत. काही यूजर्सना आमिर-कियाराची नवीन जाहिरात अजिबात आवडली नाही, ज्यासाठी त्यांना टार्गेट केले जात आहे. दोघांवर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप होत आहे. यावर 'द काश्मीर फाइल्स'चे निर्माते विवेक अग्निहोत्री यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.


काय म्हणाले विवेक अग्निहोत्री?


आमिरच्या या नव्या जाहिरातीमुळे विवेक अग्निहोत्री चांगलेच संतप्त झाले आहेत आणि त्यांनी सोशल मीडियावर अभिनेत्याला फटकारले आहे. ट्विटरवर आपली प्रतिक्रिया देताना त्यांनी लिहिले की, 'असा मूर्खपणा करा आणि मग म्हणा की, हिंदू आम्हाला ट्रोल करत आहेत...'


पाहा व्हिडीओ :



आमिर खान आणि कियारा अडवाणीने या जाहिरातीत काम केले आहे. यामध्ये दोघे वधू आणि वरच्या वेशात दिसत आहेत. परंपरा बदलायची असं म्हणत जाहिरातीमध्ये आमिर खान लग्नानंतर कियाराच्या घरी जाताना दिसणार आहे. कारण, त्याला पत्नीच्या आजारी वडिलांची जबाबदारी घ्यायची आहे. हा सीन झाल्यानंतर आमिर एका बँकेत दिसतो आणि म्हणतो की, 'शतकांपासून सुरु असलेली ही परंपरा अशीच का सुरु ठेवायची? म्हणूनच आम्ही प्रत्येक बँकिंग सुविधेवर प्रश्न विचारतो. जेणेकरून तुम्हाला उत्तम सेवा मिळेल. आमिर-कियाराच्या जाहिरातीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.


नेटकरीही संतापले!


विवेक अग्निहोत्री यांच्या या ट्विटवर आता लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, 'मी या बँकेत एफडी केली होती, जी आता बंद करणार आहे.' दुसर्‍या यूजरने लिहिले की, 'प्रत्येकवेळी आमच्याच धार्मिक भावना का दुखावल्या जातात, इतर कोणत्याही धर्माच्या का नाही?' याशिवाय अनेक यूजर्स विवेकच्या समर्थनार्थ ट्विट करत आहेत.


हेही वाचा :


Vivek Agnihotri,Sharad Pawar: विवेक अग्निहोत्रींची शरद पवारांवर टीका; म्हणाले, 'त्यांनी आयुष्यभरात...'