Salman Khan Viral Video: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) सध्या त्याच्या   'टायगर 3' (Tiger 3) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याच्या  'टायगर 3'  या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आहे. सध्या सलमान खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान हा एका इव्हेंटमध्ये डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान हा थकल्यासारखा दिसत आहे, असं काही चाहत्यांचे मत आहे. अनेकांनी सलमानच्या या व्हायरल व्हिडीओवर कमेंट करुन भाईजानच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. 


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सलमान हा  सिल्वर कलरचे जॅकेट आणि ब्लॅक पँट अशा लूकमध्ये दिसत आहे. तो या व्हिडीओमध्ये त्याच्या हमका पीनी है आणि सजन रेडियो या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. एका बर्थ-डे पार्टीमधील हा व्हिडीओ आहे, असं म्हटलं जात आहे. सलमानच्या या व्हायरल व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. 


पाहा व्हिडीओ:






चाहत्यांनी व्यक्त केली चिंता


सलमानच्या व्हायरल व्हिडीओला कमेंट करुन अनेक चाहत्यांनी सलमानच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'सलमान थकल्यासारखा दिसतोय, त्यानं तब्येतीकडे लक्ष दिले पाहिजे' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'तो थकलेले आणि अनहेल्दी दिसत आहे किंवा तो त्याच्या वयामुळे तसा दिसत आहे. तो बरा असेल अशी मला आशा आहे.'






 टायगर 3 येणार प्रेक्षकांच्या भेटीस


सलमानच्या दबंग, बजरंगी भाईजान या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता  सलमानच्या टायगर-3 या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. सलमानचा 'एक था टायगर' हा चित्रपट  2012मध्ये रिलीज झाला होता. त्यानंतर 2017 मध्ये 'टायगर जिंदा है' रिलीज झाला होता आता त्याचा टायगर-3 हा चित्रपट रिलीज होत आहे.  टायगर 3 या चित्रपटामध्ये सलमान खानसोबतच कतरिना कैफ,  इमरान हाश्मी, आशुतोष राणा हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Tiger 3 Fans Reaction: "तो दिवाळीला येणार आणि सर्व रेकॉर्ड्स तोडणार"; भाईजानच्या 'टायगर 3' चा टीझर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी दिली अशी रिअॅक्शन