Bipasha Basu on Trolling:  अभिनेत्री बिपाशा बसू (Bipasha Basu) ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. करण सिंह ग्रोव्हर (Karan Singh Grover) आणि बिपाशा हे  गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आई-बाबा झाले. बिपाशा आणि करण यांनी त्यांच्या मुलीचे नाव देवी असं ठेवलं आहे. देवीच्या जन्मानंतर बिपाशाच्या वाढलेल्या वजनामुळे अनेकांनी ट्रोल केलं. आता एका मुलाखतीमध्ये बिपाशानं या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे. 


काय म्हणाली बिपाशा?


बॉडी शेमिंग आणि ट्रोलिंग याबाबत बिपाशानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. बिपाशा बसूने प्रसूतीनंतरच्या वाढलेल्या वजनामुळे ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे. तिने मुलाखतीमध्ये सांगितले की, “मी ट्रोलर्सला सांगू इच्छिते की, कृपया तुम्ही ट्रोल करत रहा. मला काही फरक पडत नाही. कारण मला याचा त्रास होत नाही." बिपाशानं दिलेल्या या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


पुढे बिपाशानं सांगितलं, "मी सगळ्यात आधी देवीचा विचार करते. माझे डोळे उघडे असोत किंवा बंद असो, मला फक्त देवीचा चेहरा दिसतो. प्रत्येक वेळी जेव्हा मी बाहेर पडते तेव्हा मी लवकरात लवकर देवीकडे जाण्याचा प्रयत्न करते. माझं आयुष्य आतातिच्याभोवती फिरत आहे. प्रायोरिटी लिस्टमध्ये करण हा तिसऱ्या क्रमांकावर आहे, मी दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि देवी पहिल्या क्रमांकावर आहे."






बिपाशा आणि करण सिंह ग्रोव्हरनं  2016 मध्ये लग्न केलं. बिपाशा ही करण, देवा आणि तिच्या कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. बिपाशानं शेअर केलेल्या फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.






बिपाशाचे चित्रपट


धूम 2, फिर हेरा फेरी,नो एन्ट्री, मेरे यार की शादी है या चित्रपटांमध्ये बिपाशानं काम केलं आहे. तर करणनं  कुबूल है,  दिल मिल गए,  दिल दोस्ती डान्स या मालिकेमध्ये काम केलं आहे.  बिपाशाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Bipasha Basu Daughter: बिपाशाच्या मुलीच्या हृदयाला होती दोन छिद्रं,लेकीबाबत बोलताना अभिनेत्री झाली भावूक