नवी दिल्लीः बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण बॉलिवूडमधील सध्याचे सुपरस्टार आहेत. सलमानने दीपिकाला भेटण्यासाठी जाहिरातीचं शुटिंग जवळपास दोन तास थांबून ठेवलं, असं वृत्त मिड डे दैनिकाने सुत्रांच्या हवाल्याने दिलं आहे.


 

 

दीपिका आणि सलमान दोघेही आतापर्यंत सोबत पडद्यावर दिसलेले नाहीत. सलमान शुटिंगसाठी तयार होता. मात्र दीपिका जवळच शुटिंग करत असल्याचं त्याला समजलं. सलमानने दीपिकाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. दोघांनी भेटल्यानंतर भरपूर वेळ गप्पा मारल्या. त्यामुळेच शुटिंग करण्यात दोन तास उशीर झाला, असं वृत्त आहे.

 

 

सलमान अपकमिंग सिनेमा 'ट्यूबलाईट'च्या शुटिंगसाठी लडाखला जाणार आहे. त्यापूर्वी तो सर्व जाहिरातींच सुटिंग सध्या पूर्ण करत आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि सलमान एका जाहिरातीचं शुटिंग करणार होते. मात्र सलमान दीपिकाच्या भेटीने सर्वांनाच दोन तास वाट पाहावी लागली.