'सुलतान' सिनेमात सलमान एका रांगड्या पैलवानाच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र खऱ्या आयुष्यात सलमान तेवढाच इमोशनल आहे.
सुलतानच्या सेटवर सलमान अतिशय भावूक झाला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सलमान रडण्याचं कारण होतं, 'जग घूमिया' हे गाणं. हे गाणं स्वत: सलमानने गायलं आहे. पण गाण्याचे शब्द त्याच्याशीच निगडीत असल्याचं सलमानला वाटलं आणि त्याला अश्रू अनावर झाले.
'जग घूमिया' हे केवळ एक प्रमोशनल साँग नसून ते या सिनेमाचा एक भाग असेल. विशाल-शेखर या जोडीने हे गाणं संगीतबद्ध केलं आहे.
'सुलतान' सिनेमात या सिनेमात सलमान खान एका हरियाणाच्या कुस्तीपटूची भूमिकेत आहे. या चित्रपटात अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट ‘ईद’ला रिलीज होणार आहे.
संबंधित बातम्या