मुंबई : मल्टीस्टारर कॉमेडी सिनेमा 'हाऊसफुल 3'चा धम्माल ट्रेलर आणि पहिलं गाणं रिलीज झालं आहे. या सिनेमात अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, बोमन इराणी, जॅकी श्रॉफ, जॅकलीन फर्नांडिस, नर्गिस फक्री आणि लिजा हेडन मुख्य भूमिकेत आहेत.

 

सिनेमात बोमन इराणी जॅकलीन, नर्गिस आणि लिजा हेडनच्या वडिलांच्या भूमिकेत आहेत. त्यांना आपल्या तिन्ही मुलींचं लग्न करायचं नाही आणि त्यामागे एक मजेशीर कारण आहे. तर या तिन्ही मुलींना बॉयफ्रेण्डसोबतच लग्न करायचं आहे. तर जॅकी श्रॉफ निगेटिव्ह भूमिकेत असल्याचं ट्रेलरवरुन दिसतं.



तर 'प्यार की माँ की' हे चित्रपटाचं पहिलं गाणंही कालच प्रदर्शित झालं. गाणं नकास अजिज, दिव्या कुमार, अनमोल मलिक आणि शरीब-टोशी यांनी हे गायलं आहे.

 

साजिद-फरहाद यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा सिनेमा 2010 मध्ये आलेला 'हाऊसफुल' चा तिसरा भाग आहे. चित्रपटाचा दुसरा भाग 2012 मध्ये रिलीज झाला होता. पहिल्या भागात अक्षय कुमार आणि रितेश देशमुख सह अर्जुन रामपाल, दीपिका पादूकोण, लारा दत्ता आणि जिया खान मुख्य भूमिकेत होते.

 

'हाऊसफुल' आणि 'हाऊसफुल 2' ची कथा पूर्णपणे वेगळी होती. आता 'हाऊसफुल 3' ची कथा प्रेक्षकांना आवडणार का बघण्यासारखं असेल. 'हाऊसफुल 3' चित्रपट 3 जूनला जगभरात प्रदर्शित होईल.

 

पाहा ट्रेलर



 

पाहा गाणं