Salman Khan Relationship : बॉलिवूडचा 'दबंग' सलमान खान चित्रपटांपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो. सलमान खानचं अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत अफेअर होतं. यामध्ये ऐश्वर्या राय, कतरिना कैफ, संगीता बिजलानी आणि सोमी अली या अभिनेत्रींच्या नावांचा समावेश आहे. पण, फक्त अफेअर नाही, तर सलमान खान एका अभिनेत्रीसोबत लग्नही करणार होता. लग्नाच्या पत्रिका छापल्या गेल्या होत्या, पण सलमानचं लग्न मोडलं.
पाईपवर चढून एक्स गर्लफ्रेंडला भेटायला जायचा सलमान
अभिनेता सलमान खान अभिनेत्री संगीता बिजलानीसोबत लग्न करणार होता. इतकंच नाही तर, त्याच्या लग्नाचे कार्डही छापले होते, पण शेवटच्या क्षणी असं काही घडलं की संगीताने सलमानसोबतचं नातं तोडलं. सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली अनेकदा तिच्या आणि सलमान खानच्या नात्याबद्दल उघडपणे बोलली आहे. अभिनेत्रीने अलिकडेच एका मुलाखतीत खुलासा केला की, त्यांच्या डेटिंगच्या दिवसांमध्ये सलमान खिडकीतून तिच्या खोलीत जायचा आणि तिला भेटायचा.
सोमी अलीचा मोठा खुलासा
टाइम्स नाऊला दिलेल्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सोमी अलीने सलमान खानसोबतच्या तिच्या डेटिंगदरम्यानच्या आणखी काही गोष्टी सांगितल्या आहेत. सोमी अली म्हणाली, 'मी त्यावेळी विंध्याचलमध्ये राहात होते. माझं दोन बेडरूमचे अपार्टमेंट होतं. सलमान अनेकदा पाईपवर चढून खिडकीतून माझ्या खोलीत यायचा. मला सलमानचं हे वागणं मला खूपच रोमँटिक वाटायचं.
जेव्हा संगीताने सलमानला रंगेहाथ पकडले
सोमीने सांगितलं की, 'मला आठवतं की एके दिवशी तो सकाळी साडेदहा वाजता तिथे आला होता. ही घटना घडली तेव्हा तो संगीतासोबत रिलेशनशिपमध्ये होता आणि त्यांच्या लग्नाच्या पत्रिकाही छापल्या गेल्या होत्या. यावेळी संगीताने सलमानला रंगेहात पकडलं होतं, असा खुलासा सोमीने केला. सलमान आणि मी माझ्या खोलीत बसलो होतो आणि संगीता अचानक आत आली, असं सोमीनं सांगितलं.
या कारणामुळे मोडलं सलमान आणि संगीताचं लग्न
मीडिया रिपोर्टनुसार, संगीता बिजलानी आणि सलमान खान 27 मे 1994 रोजी लग्न करणार होते. त्यांच्या लग्नाच्या पत्रिका छापल्या गेल्या होत्या पण त्याच दरम्यान संगीताला सलमान खानच्या अफेअरची माहिती मिळाली. त्यानंतर तिने सलमानसोबत लग्न करण्यास नकार दिला. संगीताने सलमानला सोमी अलीसोबत रंगेहाथ पकडलं, त्यानंतर संगीताने लग्नाच्या महिनाभर आधी सलमानसोबतचे लग्न मोडले.