सलमान खानच्या या चित्रपटाने त्याच्याच जुन्या सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढले आहे. भारत हा प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या सलमान खानच्या चित्रपटांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतने पहिल्याच दिवशी 42.30 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
सलमानचा नाशिकमधील जबरा फॅन, 'भारत'साठी बूक केलं संपूर्ण थिएटर
प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या सलमान खानच्या चित्रपटांच्या यादीत 'सुलतान' पहिल्या क्रमांकावर होता. सुलतानने 36.54 कोटी रुपयांची ओपनिंग मिळवली होती. परंतु हा रेकॉर्ड मोडीत भारतने 42.30 कोटी रुपयांची ओपनिंग मिळवली आहे.
भारत सिनेमात सलमान सहा भूमिकांमध्ये दिसणार आहे. यामध्ये तरुण सर्कस चॅम्पियनपासून ते 60 वर्षाच्या व्यक्तीरेखेत सलमान दिसणार आहे. सिनेमात सहा दशकांचा एका व्यक्तीचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे सलमान सहा विविध भूमिकांमध्ये दिसणार आहे. सिनेमात सलमानसोबत कॅटरिना कैफ, तब्बू, दिशा पटानी, सुनील ग्रोवर आणि जॅकी श्रॉफ हे देखील झळकणार आहेत.
अतुल अग्निहोत्री, अलवीरा अग्निहोत्री, भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि सलमान खानने या सिनेमाची निर्मिती केली आहे. तर अली अब्बास जफरने सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.
प्रेक्षकांना कसा वाटला सलमान खानचा 'भारत'? | एबीपी माझा
कमाईबाबतचं भारतच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन केलेलं ट्वीट