सलमान आणि विराट लवकरच एकत्र दिसणार?
एबीपी माझा वेब टीम | 18 Sep 2016 11:33 PM (IST)
नवी दिल्लीः बॉलिवूडचा स्टार सलमान खान आणि क्रिकेटचा स्टार विराट कोहली लवकरच एका व्हिडिओ अल्बममध्ये एकत्र दिसण्याची शक्यता आहे.बेल्जियमचे डीजे स्टार्स लाईक माईक आणि दिमित्री वेगस दोघांना एकत्र आणण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. विराट आणि सलमान ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या सनबर्न फेस्टिव्हलसाठीही उपस्थित राहणार असल्याचं बोललं जात आहे. दोन्ही बेल्जियम स्टार्सनी मागील वर्षीपासून गोवा सनबर्न फेस्टिव्हलची सुरुवात केली आहे. सलमान आणि विराट दोघांनीही माईक आणि वेगस यांना ट्विटरवरुन पाठिंबा दिला आहे. https://twitter.com/BeingSalmanKhan/status/775625081255002113 या बेल्जियम जोडीने सलमान आणि विराटचे पाठिंबा दिल्याबद्दल आभारही मानले आहेत. बेल्जियम जोडीने सिनेमा, संगीत आणि खेळ या तिन्ही प्रकारांना एकत्रित सादर करण्याचं नियोजन केलं आहे. त्यामुळेच सलमान आणि विराटची जोडी निवडली जाणार आहे. https://twitter.com/imVkohli/status/775216262108487680