ऋषी कपूर यांची मीडियावर आगपाखड
एबीपी माझा वेब टीम | 18 Sep 2016 03:12 PM (IST)
मुंबई: पत्रकार आणि चाहत्याला केलेल्या मारहाणीनंतर ऋषी कपूर यांची मीडियावरच आगपाखड केली आहे. आपलं नाव या प्रकरणी मीडियानं बदनाम केल्याची टीका त्यांनी केली आहे. मुंबईतल्या एका अवॉर्डच्या कार्यक्रमात ते बोलत होते. गणपती विसर्जनाच्यावेळी कपूर कुटुंबियांनी एका चाहत्याला आणि पत्रकाराला मारहाण केली होती. यावर ऋषी कपूर यांनी प्रतिक्रिया देत मीडियालाच आरोपी केलं. आर के फिल्म स्टुडिओच्या गणपती विसर्जनाच्या वेळी रणधीर कपूर यांनी पत्रकाराला तर ऋषी कपूर यांनी फॅनला मारहाण केल्याची दृश्यं कॅमेऱ्यात कैद झाली होती. मात्र आता उलट ऋषी कपूर यांनी मीडियावरच आगपाखड केली. संबंधित बातम्या कपूर खानदानाची दादागिरी, पत्रकारांना मारहाण