मुंबई : बॉलिवूडचे दोन सर्वात मोठे स्टार सलमान खान आणि करण जोहर दोघेही त्यांच्या सहनिर्मितीतला पहिला सिनेमा लवकरच अक्षय कुमारसोबत करणार आहेत. करण जोहरने वर्षाच्या सुरुवातीला ही बातमी दिली आहे.


बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार या सिनेमात मुख्य भूमिकेत असेल. तर दिग्दर्शन अनुराग सिंह करणार असून हा सिनेमा 2018 मध्ये रिलीज होईल. करण जोहरने ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे.

https://twitter.com/karanjohar/status/815958962260611072

सलमान आणि अक्षय कुमार दोघांनीही या सिनेमाबाबत मोठी उत्सुकता असल्याचं म्हटलं आहे. मात्र सलमानच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी अशी की, या सिनेमात तो केवळ सहनिर्माता असून कोणत्याही भूमिकेत नसेल.

दरम्यान हा सिनेमा 2018 मध्ये रिलीज होईल. पण हा सिनेमा कशावर आधारित असेल, याबाबत अजून कसलीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे चाहत्यांना जोरदार उत्सुकता लागली आहे.

अक्षय कुमार यावर्षी चार सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यातच आता 2018 मधील पहिला सिनेमाही जाहीर झाला आहे.

अक्षय कुमारकडून 2017 मधील सिनेमांची यादी जाहीर