‘नवाज शरीफ’ नव्हे, ‘बेनवाज शरीर’ नाव हवं होतं : सलीम खान
एबीपी माझा वेब टीम | 20 Sep 2016 06:52 PM (IST)
मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान यांनी ट्विटरवरुन पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर घणाघात केला आहे. “जर पाकिस्तानात त्यांच्याच पंतप्रधानांचं कुणी ऐकत नसेल, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताबद्दलच्या त्यांच्या तक्रारींकडे कोण लक्ष देईल?”, असा सवाल करत सलीम खान यांनी टीका केली आहे. शिवाय, सलीम खान म्हणाले, “पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं नाव ‘बेनवाज शरीर’ ठेवायला हवं. https://twitter.com/luvsalimkhan/status/778149495284633600 “मिस्टर शरीफ, माफी मागतो, ज्यांनी तुमचं नाव ठेवलं होतं. नाव ठेवणाऱ्यांना तुमच्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती असती, तर तुमचं नाव ‘बेनवाज शरीर’ ठेवलं असतं. त्यामुळे नाव ठेवणाऱ्यांकडून चूक झालीय.”, असा ट्वीट सलीम खान यांनी केला आहे. https://twitter.com/luvsalimkhan/status/778149542369910785 सलीम खान यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, “मिस्टर शरीफ, पाकिस्तानात तुमचं कुणीच ऐकत नाही, मग ते लष्कर असो किंवा जनता. उत्सुकतेची बाब म्हणजे, तुमचं कुटुंब तरी तुमचं ऐकतं का?” https://twitter.com/luvsalimkhan/status/778149575207124992