मुंबई : पाकिस्तानी कलाकारांचं समर्थन करुन पुन्हा एकदा वादात अडकलेल्या अभिनेता सलमान खानच्या बचावासाठी सलमानचे वडील आणि ज्येष्ठ पटकथाकार सलीम खान सरसावले आहेत. सलमानचा बचाव किंवा माफी मागून प्रश्न निकालात काढण्याऐवजी सलीम खान यांनी टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं आहे.


प्रकरण काय आहे?

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवरुन बॉलिवूडमध्ये दोन गट निर्माण झाले. एका गटात पाकिस्तानी कलाकारांच्या काम करण्याविरोधात आहेत, तर दुसरा गट पाकिस्तानी कलाकारांना विरोध करणाऱ्यांना विरोध करत आहे. सलमान दुसऱ्या गटात सहभागी झाला असून, त्याने या सर्व प्रकरणावर वादग्रस्त विधानही केले. "पाकिस्तानी कलाकारांचं दोष काय? ते दहशतवादी नाहीत.", असे म्हणत सलमान खानने पाकिस्तानी कलाकारांची पाठराखण केली होती.



सलमान खानच्या विधानानंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली. त्यानंतर आता सलमानचे वडील सलीम खान हे त्याच्या बचावासाठी आले आहेत. सलीम खान यांनी ट्विट करुन सलमानच्या विरोधकांना धारेवर धरलं.

'टाईम्स नाऊ' चॅनेलवर निशाणा साधत सलीम खान म्हणाले, "ब्रेकिंग न्यूज टाईम्स नाऊच्या 'वाँटेड लिस्ट'मध्ये सईद, लख्वी आणि मसूद यांच्या जागी सलमान खान, महेश भट्ट, करण जोहर आणि सीताराम येचुरी यांनी घेतलीय. कारण हे लोक आपल्या देशासाठी अत्यंत घातक आहेत."

सलमान खान याआधीही वादग्रस्त विधानं करुन अडचणीत आला होता. प्रत्येकवेळी सलीम खान आपल्या मुलासाठी म्हणजे सलमानसाठी माफी मागत आले आहेत, त्याचा बचाव करत आले आहेत. मात्र, यावेळी सलमानसाठी माफी मागण्याऐवजी त्यांनी विरोधकांनाच सुनावले आहे.

संबंधित बातम्या

बॉलिवूड कुणाच्या बापाचं नाही, फवाद खान बरळला

पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचं भारतातून गुपचूप पलायन?

भारताविरुद्ध गरळ ओकणाऱ्या पाक अभिनेत्याला ब्रिटीश चॅनलचा दणका

चित्रपट क्षेत्रात जगभरातल्या सर्वांना जागा दिली पाहिजे: सैफ अली खान

पाकिस्तानी कलाकारांसाठी बॉलिवूडचे दरवाजे बंद

अभिनेता सलमान खानला पाकिस्तानी कलाकारांचा पुळका

सलमानकडून पाक कलाकारांचं समर्थन, मनसेकडून फक्त निषेध!

सलमानला धंदा दिसतो, शहिदांचं बलिदान नाही, राज ठाकरेंचा घणाघात

फोटो: सलमानच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे बॉलिवूडमध्ये उभी फूट 

सलीम खान यांनी सलमानला घरात कोंडून ठेवावं: शिवसेना