मुंबई : रिओ ऑलिम्पिकसाठी गुडविल अॅम्बेसेडर म्हणून सलमानची निवड झाल्यानंतर वादाला सुरुवात झाली असताना, सलमानचे वडील सलीम खान त्याच्या बचावासाठी पुढे आले आहेत. सलीम खान यांनी आपल्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरुन ट्वीट करत सलमानचा बचाव केला आहे.

https://twitter.com/luvsalimkhan/status/724570897525284865

“सलमान कोणत्याही स्पर्धेत सहभागी झाला नाही. मात्र, तो एक उत्तम जलतरणपटू, सायकलिस्ट आणि वेट लिफ्टर आहे.”, असा ट्वीट सलीम खान यांनी केला आहे.

https://twitter.com/luvsalimkhan/status/724572129497223169

सलमानच्या निवडीला मिल्खा सिंग यांनीही विरोध केला होता. त्यांना उत्तर देताना सलीम खान म्हणाले, “ही बॉलिवूड इंडस्ट्री नव्हे, भारतीय फिल्म इंडस्ट्री आहे; जी जगातील सर्वात मोठी इंडस्ट्री आहे. शिवाय, याच इंडस्ट्रीने तुम्हाला अंधारातील दुनियेतून बाहेर आणलं होतं.”

https://twitter.com/luvsalimkhan/status/724572347622023168

सलमान खानची रिओ ऑलिम्पिकच्या गुडविल अँबेसेडरपदी निवड झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा पैलवान योगेश्वर दत्तने विरोध केला होता. त्यानंतर मिल्खा सिंग यांनीही विरोध केला.