VIDEO: मराठी कलाकारांचा झिंगाट डान्स
एबीपी माझा वेब टीम | 25 Apr 2016 01:18 PM (IST)
मुंबई : महाराष्ट्राला 'याड' लावणाऱ्या सैराट सिनेमातील झिंगाट गाण्यासंबंधित आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार हिट्स मिळवतो आहे. मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनाही आता या गाण्यावर ठेका धरण्याचा मोह आवरलेला नाही. 'झिंग झिंग झिंगाट' म्हणत मराठी कलाकारांनी चांगलाच ठेका धरला. हाच व्हिडीओ सोशल मीडियावर सुसाट सुटला आहे. VIDEO: मराठी कलाकरांचा झिंगाट डान्सचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वीच या गाण्यावर 'सैराट' सिनेमाचा दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि संगीतकार अजय-अतुल यांनीही बेभान होऊन डान्स केला होता. तो व्हिडीओही चांगलाच हिट झाला होता.