Salaar: अभिनेता प्रभासचा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवशी अनेक सेलिब्रिटी तसेच त्याचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभासला शुभेच्छा देत आहेत. प्रभासच्या (Prabhas) वाढदिवशी चाहत्यांना एक खास सरप्राइज मिळालेलं आहे. प्रभासच्या 'सालार' (Salaar) या चित्रपटाचा एक नवा पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. या पोस्टरवर प्रभासचे विविध लूक्स दिसत आहेत.


बहुप्रतिक्षित 'सालार' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. अशातच प्रभासच्या वाढदिवशी सालार या चित्रपटाचा एक नवा पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करुन सालार चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रभासला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


'सालार' चित्रपटाच्या या पोस्टरनं अनेकांचे लक्ष वेधले  आहे. या पोस्टरमध्ये  प्रभास एक दोन नव्हे तर अनेक लूक्समध्ये दिसत आहे. हे पोस्टर सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. पोस्टरवरील प्रभासच्या लूक्सचे चाहते खूप कौतुक करत आहेत. 






सालार चित्रपटाची रिलीज डेट


सालार चित्रपटाचे ओटीटी राइट्स विकले गेले आहेत, असं म्हटलं जात आहे. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचे राइट्स 80 कोटी रुपयांना विकले गेले आहेत.  सालार चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचे पोस्टर शेअर करुन चित्रपटाच्या रिलीज डेटची देखील माहिती दिली आहे. सालार हा चित्रपट आधी  28 सप्टेंबर रोजी रिलीज होणार होता. पण नंतर या चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली. आता हा चित्रपट 22 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 


चित्रपटाची स्टार कास्ट


'सालार' या चित्रपटामध्ये प्रभाससोबतच पृथ्वीराज सुकुमारन,श्रुती हासन,  टिन्नू आनंद, ईश्‍वरी राव, श्रिया रेड्डी आणि रामचंद्र राजू हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.  प्रभासचा 'सालार'  हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 'सालार' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रशांत नीलने सांभाळली आहे. याआधी प्रशांतने 'केजीएफ चॅप्टर 1' आणि 'केजीएफ चॅप्टर 2' सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. प्रभासच्या 'सालार' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या:


Salaar Poster Out: पृथ्वीराज सुकुमारनच्या 'सालार' मधील जबरदस्त लूकनं वेधलं लक्ष; अभिनेता चित्रपटात साकारणार 'ही' भूमिका