Salaar Online Leaked: अभिनेता प्रभासचा (Prabhas) 'सालार' (Salaar) हा चित्रपट आज (शुक्रवार) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये क्रेझ दिसत आहे.'सालार' या चित्रपटानं  अॅडव्हान्स बुकिंगमध्ये बंपर कमाई केली आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर या चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केला आहे. पण रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाला पायरसीचा फटका बसला आहे. प्रभासचा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही तासातच ऑनलाइन लीक झाला आहे. 


'सालार' एचडी प्रिंटमध्ये लीक (Salaar Online Leaked)


प्रभासच्या 'सालार' हा चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांच्या बाहेर गर्दी करत आहेत. अशातच सालार हा चित्रपट ऑनलाईन लीक झाला आहे. बॉलीवूड लाइफच्या रिपोर्टनुसार, 'सालार' हा चित्रपट टेलिग्राम, तमिलरॉकर्स, मूवीरुल्झ, तमिलएमव्ही, फिल्मीझिला, इबोम्मा आणि टोरेंट वेबसाइट्ससारख्या अनेक पायरेटेड साइट्सवर फुल एचडी प्रिंटमध्ये विनामूल्य डाउनलोडसाठी उपलब्ध आहे. आता 'सालार' हा चित्रपट ऑनलाईन लीक झाल्यामुळे याचा परिणाम चित्रपटाच्या कमाईवर होईल का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.






चित्रपट ऑनलाइन लीक झाल्याचा परिणाम बॉक्स ऑफिस कलेक्शवर होणार?


सालार हा चित्रपट ऑनलाइन लीक झाल्याचा या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शवर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज लावला जात आहे. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 45 कोटींहून अधिक कमाई केली आहे.  रिलीजच्या पहिल्या दिवशी हा चित्रपट किती कमाई करतो? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.


 'सलार' हा चित्रपट तेलुगू, तमिळ, कन्नड, हिंदी आणि मल्याळम या भाषांमध्ये रिलीज झाला आहे. प्रभासशिवाय श्रुती हासन आणि पृथ्वीराज सुकुमारनसह अनेक कलाकारांनी 'सालार' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन केजीएफ फेम दिग्दर्शक प्रशांत नील यांनी केले आहे. चित्रपटामधील अॅक्शन सीन्सचं तसेच डायलॉग्सचं अनेकजण कौतुक करत आहेत.  दोन मित्रांची गोष्ट सालार या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाला सेन्सॉरकडून A सर्टिफिकेट मिळालं आहे. 


संबंधित बातम्या:


Salaar Twitter Review: कुणी म्हणाला, "ब्लॉकबस्टर" तर कुणी म्हणतंय, "अंगावर शहारे आले", प्रभासचा सालार प्रेक्षकांची मनं जिंकतोय; वाचा रिव्ह्यू