Salaar Box Office Collection Day 1 : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) 'सालार' (Salaar) हा सिनेमा 22 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजआधीपासून चर्चेत असणाऱ्या या सिनेमाने पहिल्याच दिवशी धमाकेदार कमाई केली आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने 'जवान' (Jawan), 'पठाण' (Pathaan) आणि 'अॅनिमल'चा (Animal) रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
'सालार' या सिनेमाच्या माध्यमातून प्रभासने जोरदार कमबॅक केलं आहे. अभिनेत्याचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या अॅक्शन थ्रिलर सिनेमाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रशांत नील दिग्दर्शित या सिनेमाची सिनेप्रेमींमध्ये चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे.
'सालार'ने मोडला बिग बजेट सिनेमांचा रेकॉर्ड!
'सालार' या सिनेमाने ओपनिंग डेला 95 कोटींची कमाई केली आहे. ओपनिंग डेलाच या सिनेमाने 'पठाण' (Pathaan), 'जवान'सह (Jawan) 'डंकी'चाही (Dunki) रेकॉर्ड ब्रेक केला आहे. प्रभासचा 'सालार' हा सिनेमा वर्षातला मोठा ओपनर ठरला आहे.
ओपनिंग डेला कोणत्या सिनेमाने किती कोटींची कमाई केली?
सालार - 95 कोटी
जवान - 65.5 कोटी
पठाण - 55 कोटी
अॅनिमल - 54.75 कोटी
केजीएफ चॅप्टर 2 - 53.5 कोटी
सालारच्या स्टारकास्टबद्दल जाणून घ्या... (Salaar Starcast)
'सालार' हा पॅन इंडिया सिनेमा आहे. प्रशांत नीलने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. प्रभाससह या सिनेमात पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन, जगपती बाबू रेड्डीसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तगडी स्टारकास्ट आणि उत्तम कथानक, दिग्दर्शन असणारा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यशस्वी ठरला आहे.
'या' कारणांनी चालतोय 'सालार'
- KGF प्रमाणे 'सालार' हा सिनेमाही प्रेक्षकांना एका वेगळ्या जगात घेऊन जात आहे.
- क्रूरपणा, हिंसा, अॅक्शन, थ्रिल अशा सर्व गोष्टी असणारा मनोरंजनात्मक सिनेमा
- प्रभासच्या दर्जेदार अभिनय
- प्रशांत नीलची उत्तम पटकथा
- अंगावर शहारे आणणारे अॅक्शन सीक्वेंस
'सालार' या सिनेमाला सेन्सॉरने ए सर्टिफिकेट दिलं आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज झाला आहे. 2 तास 55 मिनिटांच्या या सिनेमातील प्रत्येक सीन प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्यात येणार आहे. नेटफ्लिवर हा सिनेमा रिलीज होऊ शकतो. आता 'सालार' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कोटींची गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. साऊथमध्ये या सिनेमाची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे.
संबंधित बातम्या