मुंबई: राज्यातच नव्हे तर देशभरातील चाहत्यांना दखल घ्यायला लावलेल्या सैराटने अखेर बिग बी अमिताभ बच्चन यांनाही बोलायला लावलं.


सिनेमा रिलीज झाल्यानंतर, नऊ महिन्यानंतर बिग बी अमिताभ बच्चन यांनी सैराटची दिलखुलास स्तुती केली.

सैराट पाहून अमिताभ बच्चन खूपच भारावले. त्यांनी ट्विट करुन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

"मराठीतील करिष्मा अर्थात सैराट सिनेमा पाहिला. अफलातून चित्रपट, सिनेकलाकृतीचा विस्मयकारी अनुभव" अशा शब्दात अमिताभ यांनी ट्विट केलं आहे.


https://twitter.com/SrBachchan/status/824328298863861760

नागराज मंजुळे सैराट हा सिनेमा 29 एप्रिल 2016 रोजी प्रदर्शित झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश:धुमाकूळ घातला.

अभिनेता आमीर खानपासून, दिग्दर्शक करण जोहरपर्यंत बॉलिवूडमधील दिग्गजांनी सैराटचं कौतुक केलं. मात्र सर्वांना अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्रियेची प्रतिक्षा होती.

अखेर बिग बींनी सिनेमा पाहून सैराटचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.