नव्या सिनेमासाठी आकाशचं लपून-छपून शूटिंग
एबीपी माझा वेब टीम | 16 Jun 2016 06:05 AM (IST)
मुंबई : नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' चित्रपटामुळे आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु रातोरात स्टार बनले. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते अक्षरश: वेडे होतात. मात्र याचा फटका त्यांच्या खासगी आयुष्यालाही बसत आहे. आकाशच्या दुसऱ्या सिनेमाच्या शूटिंगवर याचा परिणाम जाणवत आहे. महेश मांजरेकर यांच्या 'FU' या आगामी सिनेमात आकाश ठोसर काम करत आहे. सिनेमाची शूटिंग महाराष्ट्राच्या विविध भागात सुरु आहे. परंतु चाहत्यांच्या गर्दीमुळे आकाशला प्रचंड पोलिस बंदोबस्तात राहावं लागत आहे.