मुंबई : प्रदर्शनाच्या 'उडता पंजाब' हा वादग्रस्त सिनेमा ऑनलाईन लीक झाला आहे. याविरोधात सिनेमाच्या निर्माता आणि दिग्दर्शकाने मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल केला आहे. चित्रपट उद्या म्हणजेच 17 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.


 

 

प्रदर्शनाआधी सिनेमा ऑनलाईन लीक होणं हा निर्मात्यांसाठी मोठा झटका मानला जात आहे.

 

प्रदर्शनापूर्वी 'उडता पंजाब' समोर आणखी एक अट


 

लीकची माहिती मिळताच सिनेमा हटवला!

ऑनलाईन डाऊनलोडिंग वेबसाईट टोरेंट डॉटकॉमवर हा सिनेमा अवैधरित्या डाऊनलोड करता येऊ शकतो. लीक झाल्याची माहिती मिळताच साईटवर सिनेमाच्या टीमने उडता पंजाबला टोरेंट साईटवरुन हटवला.

 

 

'उडता पंजाब'ला 'ए' सर्टिफिकेट

'उडता पंजाब' या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून 'ए' सर्टिफिकेट देण्यात आलं आहे. सेन्सॉर बोर्डाने या आधी या चित्रपटातील 89 दृश्यांना कात्री लावण्याची सूचना दिली होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या केवळ एक कट आणि 3 डिसक्लेमरसह हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा आदेश दिला आहे.

89 नव्हे, एकच कट, 'उडता पंजाब'ला हायकोर्टाचा दिलासा


 

अभिषेक चौबे दिग्दर्शित या सिनेमात शाहिद कपूर, आलिया भट, करीना कपूर आणि दिलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत आहे. दिलजीत 'उडता पंजाब'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

 

संबंधित बातम्या

‘उडता पंजाब’ला सेन्सॉरकडून ‘ए’ सर्टिफिकेट, आज हायकोर्टात सुनावणी


तुम्ही फक्त प्रमाणपत्रं द्या, निवडीचा अधिकार प्रेक्षकांना : हायकोर्ट


‘उडता पंजाब’ वाद: मुंबई हायकोर्टात आज काय झालं?