मुंबई : यंदाच्या मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये यंदा सैराटची आणि आर्ची-परश्याची धूम पाहायला मिळाली. निस्सीम आणि ऐन तारुण्यातल्या प्रेमावर भाष्य करणाऱ्या सैराट चित्रपटानं फिल्मफेअरच्या बऱ्य़ापैकी सर्व पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली.
सर्वौत्कृष्ट फिल्म, सर्वौत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वौत्कृष्ट म्युझिक अल्बम, सर्वौत्कृष्ट अभिनेत्री असे पुरस्कार सैराट चित्रपटानं पटकावले आहेत.
आर्ची फेम रिंकू राजगुरुनं सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, तर नटसम्राट सिनेमातल्या परफॉर्मन्सकरता नाना पाटेकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
सैराट चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या आकाश ठोसरनंही पदार्पण करणाऱ्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या विभागात पुरस्कार पटकावला आहे.
मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये यंदा सैराटची धूम
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Oct 2017 11:31 PM (IST)
निस्सीम आणि ऐन तारुण्यातल्या प्रेमावर भाष्य करणाऱ्या सैराट चित्रपटानं फिल्मफेअरच्या बऱ्य़ापैकी सर्व पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -