मुंबई : 'सैराट' चित्रपटाची विक्रमी घोडदौड सुरुच असून चार आठवड्यांमध्ये सैराटने 75 कोटी रुपये कमावल्याची माहिती आहे. बॉलिवूड हंगामा या वेबसाईटने सैराटच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन विषयी आकडेवारी दिली आहे. महाराष्ट्रासह देशभरातून आर्ची-परशा यांच्या आगळ्यावेगळ्या प्रेमकहाणीवर प्रेक्षकांनी जीव ओवाळून टाकला आहे. सैराट चित्रपटाला पहिल्याच आठवड्यात पायरसी फटका बसूनही रिपीट ऑडिअन्स असल्यामुळे ही विक्रमी कामगिरी करता आली आहे. https://twitter.com/Bollyhungama/status/736499669467942912 मराठी चित्रपटांच्या इतिहासातील हा सर्वोच्च आकडा ठरला आहे. 'झी' समुहातर्फे मात्र सैराटच्या गल्ल्याविषयी कोणतीही अधिकृत आकडेवारी देण्यात आलेली नाही. 29 एप्रिल रोजी ‘सैराट’राज्यभरातील 400 थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र दुसऱ्या आठवड्यात सिनेमाचे शो 8500 ते 14,000 पर्यंत वाढले. इतकंच नाही साताऱ्यात मध्यरात्री 12 आणि पहाटे 3 चा शोही सुरु होता. ‘सैराट’चं हे यश सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणारं होतं. मराठी सिनेमात हे पहिल्यांदाच घडत होतं, असं नितीन केणी यांनी सांगितलं.
सैराटचा 28 दिवसातील गल्ला :
दिवस 1 . शुक्रवार 29 एप्रिल 2016 | कमाई (कोटी रुपये) 3.60 |
| 2. शनिवार 30 एप्रिल 2016 | 3.95 |
| 3. रविवार 1 मे 2016 | 4.55 |
| दिवस 4 (सोम) ते दिवस 7 (गुरु) | 13.4 |
| दिवस 8 (शुक्र) ते दिवस 11 (सोम) | 15.61 |
| दिवस 12 (मंगळ) ते दिवस 14 (गुरु) | 10.89 |
| दिवस 15 (शुक्र) ते दिवस 16 (शनि) | 3 |
| दिवस 17 (रवि) ते दिवस 21 (गुरु) | 10 |
| दिवस 22 (शुक्र) ते दिवस 28 (गुरु) | 10 |
| एकूण | 75 |
अजय-अतुलच्या संगीताची जादू नितीन केणी म्हणाले की, सिनेमाचं आणखी एक बलस्थान म्हणजे गाणी. अजय-अतुलच्या संगीताने चाहत्यांना अक्षरश: झिंग आणली. चित्रपटाची गाणी अमेरिकेच्या लॉस एंजलिसमधील सोनी थिएटरमध्ये 100 वाद्य आणि म्युझिशियन्सच्या मदतीने रेकॉर्ड करण्यात आली. अजय-अतुलला अमेरिकेत पाठवण्याचा खर्च 6-70 लाख रुपये होता. ‘सैराट’ने पहिल्या आठवड्यातील शुक्रवारी 3.55 कोटी, शनिवारी 3.80 कोटी आणि रविवारी 4.85 कोटी आणि सोमवारी 2.90 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यामुळे अवघ्या चार दिवसात सैराटची कमाई 15.10 कोटी रुपयांवर गेली. यापूर्वी ‘नटसम्राट’ने एका आठवड्यात 16 कोटी 50 लाख रुपयांची कमाई केली होती. तर नऊ दिवसात नानाचा ‘नटसम्राट’ 22 कोटीच्या पार गेला होता. चौथ्या आठवड्यात हा आकडा 35 कोटींच्या घरात गेला होता. मात्र हा आकडा सैराटने अवघ्या 10 दिवसांतच पार केला. दुसरीकडे ‘कट्यार काळजात घुसली’ या सिनेमाने पहिल्या आठवड्यात 7 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ने चार दिवसात 12.70 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. लय भारीने प्रदर्शनाच्या दिवशी 3 कोटी 10 लाख, शनिवारी 3 कोटी 60 लाख, रविवारी 3 कोटी 85 लाख आणि सोमवारी 2 कोटी 15 लाखांचा गल्ला जमवला होता. तर रवी जाधव यांच्या टाईपमास- 2 ने पहिल्या 3 दिवसांमध्ये तब्बल 11 कोटी रुपयांची कमाई केली होती.
मराठी सिनेमांची कमाई यापूर्वी ‘दुनियादारी’ या सिनेमाने 26 कोटी कमावून, मराठी सिनेमाच्या कमाईचा ट्रेण्ड तयार केला होता. मग ‘टाईमपास’ या सिनेमाने त्यापुढे मजल मारून 32 कोटींची कमाई केली. याशिवाय ‘टाईमपास 2’नेही 28 कोटी कमावले होते. मात्र ‘लय भारी’ सिनेमाने तब्बल 38 कोटींचा गल्ला जमवून, मराठी सिनेसृष्टीत कमाईचा विक्रम प्रस्थापित केला होता.
मराठी सिनेमांची भरारी *दुनियादारी : 26 कोटी *टाईमपास – 32 कोटी *टाईमपास 2 – 28 कोटी *लय भारी – 38 कोटी * नटसम्राट – 40 कोटी *कट्यार काळजात घुसली – 31 कोटी संबंधित बातम्या :