मुंबई: बॉलिवू़ड अभिनेत्री कतरिना कैफनं नुकतंच Vogue मासिकासाठी एक खास फोटोशूट केलं आहे. जूनमध्ये येणाऱ्या Vogue  मासिकाच्या कव्हर पेजवर कतरिना झळकणार आहे. कतरिनाचं हे फोटोशूट सुप्रसिद्ध फोटोग्राफर Luis Monteiro यानं केल आहे.

 

कतरिनानं आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कतरिना पाण्यामध्ये पोहताना दिसून येते आहे. या व्हिडिओमध्ये कतरिना एखाद्या जलपरीप्रमाणे दिसते आहे.

 

मासिकाच्या कव्हर पेजवर कतरिना ज्या ड्रेसमध्ये दिसते आहे तो ड्रेस प्रसिद्ध फॅशन डिझायनर टॉम फ्रोड आणि अनिता श्रॉफ यांनी डिझाइन केला आहे. कतरिनाचं हे खास फोटोशूट फिलीपाईन्समधील 'केबू'मध्ये करण्यात आलं आहे.

 

target="_blank">कतरिनाच्या खास फोटोशूटचा व्हिडिओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा: