लॉस एंजेलिस : हॉलिवूड अभिनेता द रॉकने आपल्या आगामी अॅक्शनपट ‘फास्ट 8’चा लूक रिलीज केला आहे. या सिनेमात द रॉक ‘ल्यूक हॉब्स’च्या भूमिकेत दिसणार आहे. ‘ऐसशोबिज डॉट कॉम’ या वेबसाईटच्या वृत्तानुसार, द रॉकने शनिवारी इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर पहिला लूक रिलीज केला.


 

फोटोमध्ये रॉकने जिन्स आणि चामड्याचं जॅकेट परिधान केल्याचं दिसत असून, या फोटोला कॅप्शनमध्ये म्हटलंय की, “जेव्हा तुम्ही एखाद्याकडून सर्वकाही ओरबाडून घेता, त्यावेळी त्याला पुन्हा सर्व नव्याने उभारणं प्रचंड महत्त्वाचं होऊन जातं आणि कधी कधी हे अत्यंत भयानक असू शकतं.”

https://twitter.com/theedgesusu/status/736935317572292608

‘फास्ट 8’ सिनेमा हा ‘फास्ट अँड फ्युरियस’ सिनेमाचा पुढील भाग आहे. द रॉकच्या भूमिकेबद्दल त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.