सैफ-करीनाची बाळाच्या आगमनाआधीच लाखोंची उधळण
एबीपी माझा वेब टीम | 22 Aug 2016 07:20 AM (IST)
मुंबई : अभिनेता सैफअली खान आणि करिना कपूर यांनी आपल्या होणाऱ्या बाळासाठी खरेदी सुरु केली आहे. डिसेंबर 2016 मध्ये त्यांच्या घरी या छोट्या पाहुण्याचं आगमन होणार असून आपल्या बाळासाठी नर्सरी रुम सजवण्यासाठी दोघंही लाखो रुपये खर्च करताना दिसत आहेत. सैफ आणि करिनाला या बाळाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळे बाळाच्या पर्सनलाईज्ड नर्सरी रुमसाठी परदेशातही खरेदी करण्यासाठी सैफ गेला होता. लंडनमधील प्रसिद्ध हेरॉड्स या दुकानात सैफला लहान मुलांसाठीच्या वस्तू खरेदी करताना अनेकांनी पाहिलं आहे. दरम्यान सैफीनाने आपल्या बाळाची नर्सरी रुम सजवण्याचं काम एका आंतरराष्ट्रीय डिझायनरला दिलं असून लवकरच ही रूम तयार होणार आहे.