90 गायकांचा आवाज, 'गजवदना'ची सोशल मीडियावर धूम
एबीपी माझा वेब टीम | 22 Aug 2016 05:07 AM (IST)
मुंबई: मराठीतील प्रसिद्ध संगीतकार सलील कुलकर्णींनी संगीतबद्ध केलेल्या 'गजवदना' या गाण्याची सध्या सोशल मीडियावर धूम आहे. या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होतो आहे. या गाण्यासाठी मराठीतील तब्बल 90 गायकांनी आवाज दिला आहे. यामध्ये ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, आनंद भाटे, शौनक अभिषेकी, अवधूत गुप्ते, बेला शेंडे, वैशाली सामंत आदींसह दिग्गज गायकांनी हे गाणे गायले आहे. या गाण्यामध्ये गणेश स्तवनासोबतच गणपतीच्या आरतीचाही समावेश आहे. याला सलील कुलकर्णी यांचे संगीत असून, संगीत क्षेत्रातील नामांकितांनीह या गाण्यासाठी विविध वाद्यांवर साथ दिली आहे. दरम्यान, या गाण्याचा व्हिडीओ यूट्यूबरही ट्रेण्डिंग असून चार दिवसात जवळपास 40 हजार जणांनी याचा व्हिडीओ पाहिला गेला आहे. व्हिडीओ पाहा: