मुंबई: रोहित शेट्टीच्या गोलमाल चित्रपटाच्या चौथ्या सीरीजमध्ये अभिनेत्री करीना कपूर-खान मुख्य भूमिकेत नसली, तरी तिचा गेस्ट अॅपिअरन्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचा निर्माता दिग्दर्शक रोहित शेट्टीनेच याबाबतची माहिती दिली.

 

करीनाच्या प्रेग्नेंसीमुळे तिला या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी विचारणे योग्य नसल्याचे, रोहितने सांगितले. मात्र, तरीही तिचा या चित्रपटात गेस्ट अॅपिअरन्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचे त्याने सांगितले.

 

'' करीनाला चित्रपटात काम करण्याविषयी विचारणे सध्या योग्य नाही. चित्रपटाच्या शूटिंगवेळी तिला आम्ही सर्वजण मिस करू'' असे तो यावेळी म्हणाला.

 

या चित्रपटाचे शूटिंग येत्या जानेवारीपासून सुरु होणार असून, पुढच्या दिवाळीपर्यंत हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल, अशी अपेक्षा आहे.