मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान बॉलिवूडमध्ये एण्ट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे. 'स्टुडंट ऑफ द ईयर 2' मधून ती बॉलिवूडमध्ये पदापर्ण करणार आहे. मात्र ती सध्या चर्चेत आहे, ती म्हणजे तिचा एक फोटो आणि कथित प्रेमप्रकरणामुळे.

 

महत्त्वाचं म्हणजे सारा खान ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि देशाची माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू वीर पहारियाच्या प्रेमात पडल्याची चर्चा आहे.

 

इतकंच नाही तर ते दोघेही एकमेकांना डेट करत असून त्यांचा किसिंग फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो स्वत: साराने फेसबुकवर पोस्ट केला आहे.

 

एका रेडिओ चॅनेलशी केलेल्या चर्चेदरम्यान, साराने वीरवर स्तुतीसुमनं उधळली.

 

"वीर हा खूपच संवेदनशील आणि चांगल्या मनाचा मुलगा आहे. त्याला रस्त्यावरचा डोसा खाण्यासही काहीही अडचण नाही. ज्याच्यासोबत बीचवर हातात हात घालून फिरावंस वाटतं तो वीर आहे. मला त्याची सोबत खूप आवडते", असं साराने म्हटलं आहे.