दहा वर्ष लहान नवरा, सासू-सासऱ्यांना घेऊन प्रीती झिंटा भारतात
एबीपी माझा वेब टीम | 07 May 2016 06:18 AM (IST)
मुंबई : अमेरिकन बॉयफ्रेंडसोबत गुपचूप विवाहबद्ध झालेली बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा भारतात दाखल झाली आहे. मुंबई विमानतळावर प्रीतीसोबत तिचे सासू-सासरेही दिसले दहा वर्ष लहान मित्राशी लगीनगाठ बांधलेल्या प्रीतीने लग्नाच्या शाही रिसेप्शनची तयारी केली आहे. मुंबईत 13 मे रोजी हे शाही रिसेप्शन होणार आहे. या रिसेप्शनमध्ये बॉलिवूडचे कलाकार, क्रिकेटमधील दिग्गज आणि मोजक्या पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. प्रीतीने तिचा अमेरिकन मित्र जीन गुडएनफसोबत 28 फेब्रुवारीला लॉस अँजेलसमध्ये लगीनगाठ बांधली. त्यानंतर प्रीती आणि जीनचा परिवार काल सकाळी मुंबईमध्ये दाखल झाले. त्यांच्या रिसेप्शनची जय्यत तयारी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या जीन प्रीतीसह आयपीएलचा आनंद लुटत आहे. ही जोडी मोहलीमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या सामन्यासाठी दाखल झाले आहेत.