'माझ्या बाळाचं नाव तुर्की राज्यकर्त्यावरुन ठेवण्यात आलेलं नाही. मला त्या राजाविषयी पूर्ण माहिती आहे. त्याचं नाव तिमूर होतं, माझ्या मुलाचं नाव तैमूर आहे. कदाचित नावाचा उगम एकच असेल, पण नाव सारखं नाही.' असं सैफ अली म्हणतो
तैमूरचा अर्थ काय?
तैमूर हे पर्शियन भाषेतील अत्यंत जुनं नाव असल्याचं सैफ अली खानने सांगितलं. तैमूरचा अर्थ लोह किंवा लोखंड. मला आणि करिनाला या शब्दाचा उच्चार आणि अर्थ भावला. आम्ही काढलेल्या असंख्य नावांपैकी तिला हेच सगळ्यात जास्त आवडलं. या नावाला वजन आहे.
माझ्या एका लांबच्या भावाचं नाव तैमूर आहे. मी त्याच्यासोबत लहानाचा मोठा झालो. माझ्या मोठ्या मुलीचं, म्हणजे साराचं नावही आमच्या कुटुंबातील एका व्यक्तीच्या नावावरुन ठेवलं होतं.
डिस्क्लेमर द्यायला हवा
बाळाचं नाव जाहीर करताना मी डिस्क्लेमर द्यायला हवा होता. सिनेमा किंवा सिरीअलच्या सुरुवातीला दाखवतात ना... कुठल्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा, असा टोला सैफने लगावला.
स्पेशल रिपोर्ट : जगाला धडकी भरवणारा तैमूर !
तैमूर नावाला कित्येकांनी आक्षेप दर्शवला. मध्ययुगीन इतिहासाचे दाखले दिले. पण हा मूर्खपणा आहे. काही जणांनी माझी बाजूही घेतली. मला खात्री आहे आपण फॅसिस्ट समाजात राहत नाही. भारत उदारमतवादी देश आहे आणि आपण खुल्या मनाचे आहोत.
करीना कपूरने मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात 20 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 7.30 वाजता मुलाला जन्म दिला. डिलीव्हरीच्या वेळी पती सैफ अली खान, सासू शर्मिला टागोर, बहिण करिश्मा कपूरसह दोन्ही कुटुंब उपस्थित होतं.