नवी दिल्ली: शाहरुख खानचा रईस हा सिनेमा लवकरच सर्वत्र प्रदर्शित होणार असून या सिनेमातील एक संवाद सध्या सर्वाधिक लोकप्रिय होत आहे. या संवादची क्रेझ इतकी जबरदस्त आहे की, बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने यावर डबस्मॅश व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

सनीने या सिनेमातील कोई धंदा छोटा नही होता, धंदे से बडा कोई धर्म नही होता हा शाहरुखच्या आवाजातील डायलॉगचे डबस्मॅश करुन ट्विटर आणि इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.


सनीने आपल्या खट्याळ अंदाजात हा डायलॉग चांगला केला आहे. विशेष म्हणजे, या डबस्मॅशमध्ये ती अतिशय स्टाईलिश लूकमध्ये पाहायला मिळत आहे. तिने डोळ्यावर गॉगल चढवून डायलॉग शूट केला आहे. सनीने शेअर केलेला व्हिडीओ तिच्या चाहत्यांनी रिट्वीट केला आहे.