Saif Ali Khan Kareena Kapoor son Taimur : बॉलिवूडचा नवाब अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याला फक्त बॉलिवूडची पार्श्वभूमी नसून क्रिकेटशीदेखील जवळचा संबंध आहे. सैफ अली खानचे वडील मन्सूर अली पतौडी हे भारतीय क्रिकेट संघाचे दिग्गज फलंदाज होते. आता, सैफ-करीनाचा मुलगा तैमूर आता आपल्या आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवत असल्याचे दिसतेय. तैमूरने क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर फलंदाजी प्रशिक्षणाचे धडे गिरवले आहे. तैमूरच्या फलंदाजीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 


सैफ अली खान-करीना कपूर हे आपल्या मुलांसह लंडनमध्ये आहेत. या सुट्टी दरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओ सैफ अली खान हा तैमूरला क्रिकेटसंबंधी माहिती देत असताना तैमूरचे आजोबा मन्सूर अली खान पतौडी यांच्याबाबत एक माहिती देत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार असलेले मन्सूर अली खान पतौडी यांनी ससेक्स या कौंटी संघाचे नेतृत्व केले होते. तर सैफ याचे आजोबा हे वॉर्सेस्टरशायर टीमसाठी कौंटी खेळत होते. 


निरागस तैमूरचे प्रश्न....


सैफ अली खान इंग्लंडमधील कौंटी क्रिकेटची माहिती देत होता. त्यावेळी तैमूरने कौंटी म्हणजे काय असे विचारले, एमआय (मुंबई इंडियन्स) सारखे आहे का? त्यावर सैफ त्याला समजावत हे क्रिकेटचे क्लब असल्याची माहिती देत तैमूरच्या शंकांचे निरसन करतो. 






तैमूर गिरवतोय क्रिकेटचे धडे...पाहा फलंदाजीचा व्हिडीओ






इंटरनॅशनल क्रिकेट मास्टर्स यूकेच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सैफ आणि करिनाचा मोठा मुलगा तैमूर लॉर्ड्सच्या इनडोअर नेट्समध्ये सराव करताना दिसला. एकजण गोलंदाजी करत असताना, तैमूरने सफाईदारपणे हा चेंडू खेळून काढला.  तैमूरच्या या फलंदाजीवर नेटकऱ्यांनी कौतुक केले. 


 






तैमूरचा सैफ अली खानला यॉर्कर


आणखी एका व्हिडीओत तैमूरने गोलंदाजीतील कमाल दाखवली आहे.  तैमूरने आपले वडील सैफ अली खानला गोलंदाजी केली. तैमूरने सैफ अली खानला यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला. 






लंडनमध्ये मुलांसह सैफीना


सध्या करीना कपूर आणि सैफ अली खान लंडनमध्ये आपल्या मुलांसोबत सुट्टी एन्जॉय करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या व्हेकेशनचे काही फोटो शेअर केले आहेत.