Saif Ali Khan Case Update : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला होऊन दोन दिवस उलटले आहे.  पण, या प्रकरणातील हल्लेखोर सध्या फरार आहे. सैफ अली खानवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. यानंतर आता पोलिस आरोपीचा शोध घेत आहे. मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.


दोन दिवसांनंतरही सैफचा हल्लेखोर मोकाटच


सैफ अली खानवरील हल्ल्याला  50 तासांहून अधिक काळ उलटून गेला आहे. मात्र यातील हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मुंबई पोलिसांची तब्बल 35 पथके आरोपीचा मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात शोध घेत आहे. काल रात्रीपासून वांद्रे पोलिस ठाण्यात अश्या दहा ते बारा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले जे या विभागात विनाकारण भटकत होते.तसेच काही सराईत गुन्हेगारांना ही पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्यांना सिसिटीव्ही फुटेज दाखवून आरोपीची ओळख  पटविण्याचा प्रयत्न केला जात होता. 


नेमकं काय घडलं?


बुधवारी मध्यरात्री 2 वाजता अभिनेता सैफ अली खानवर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. मुंबईतील वांद्रे येथील सतगुरु शरण (Satguru Sharan) बिल्डिंगमधील त्याच्या राहत्या घरातच सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आला. चोरीच्या उद्देशाने एक चोर फायर एस्केपमधून त्याच्या घरात घुसला, यानंतर त्याच्या कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा केला. यावेळी सैफ अली खान आला . यानंतर सैफ अली खानची चोराशी झटापट झाली. सैफवर  चाकूने सहा वार केले आणि नंतर पळून गेला. सैफला त्याचा मुलगा इब्राहिम अली खानने गंभीर जखमी अवस्थेत लीलावती रुग्णालयात दाखल केले, जिथे त्यांच्यावर तासभर शस्त्रक्रिया करण्यात आली. सैफ अली खानची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर चित्रपटसृष्टीपासून ते राजकीय वर्तुळापर्यंत सर्वत्र खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Saif Ali Khan : सैफ अली खान हल्ला प्रकरण, आणखी एका संशयिताची ओळख पटली; याआधीही अशाप्रकारची चोरी करण्याचा आरोपीचा प्रयत्न?