Saif Ali Khan Attacker Mohammad : अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर चाकू हल्ला करणारा आरोपी बांगलादेशला पळून जाण्याच्या तयारीत होता अशी माहिती समोर आली आहे. हल्ल्यानंतर घाबरलेला आरोपी देश सोडण्याच्या तयारीत होता, ही माहिती समोर आली आहे. सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी खूप घाबरला होता आणि मानसिक तणावात होता, असंही पोलिस तपासात समोर आलं आहे. 


बांगलादेशला पळण्याच्या तयारीत होता आरोपी


सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शेहजाद हा हल्ल्यानंतर घाबरला होता. प्रसार माध्यमांमध्ये ज्या वेळी शहजाद याचा फोटो समोर आला, त्यावेळी एका मुकादमाने त्याला पोलिस शोधत असल्याची माहितीही दिली होती. तसेच, पोलिसांना सामोरे जाण्यासही सांगितलं होतं. बातम्या आणि प्रसारमाध्यमांमध्ये फोटो व्हायरल झाल्यानंतर मानसिक तणावात असलेला आरोपी मोहम्मद शेहजाद हा बांगलादेशला पळण्याच्या तयारीत होता. त्यासाठी तो अनेकांच्या संपर्कात होता. मात्र वेळीच पोलिसांनी त्याच्या मुस्क्या आवळल्या.


आरोपी मोहम्मद बांगलादेशी घुसखोर


अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. रविवारी सकाळी पत्रकार परिषदेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला शनिवारी रात्री 2 वाजता ठाण्यातून अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांचे डीसीपी गेडाम दीक्षित यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चोरीच्या उद्देशाने सैफ अली खानच्या घरात घुसला होता. त्याच्याकडे कोणतेही वैध भारतीय कागदपत्रे नाहीत. त्याच्याजवळ सापडलेल्या वस्तूंवरून तो बांगलादेशी असल्याचा संशय आहे.


नाव बदलून ओळख लपवण्याचा प्रयत्न


भारतात आल्यानंतर आरोपीने त्याचे नाव बदलले, असल्याचा पोलिसांचा दावा आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असल्याचेही पोलिसांनी सांगितलं आहे. त्याचं वय 30 वर्षे आहे. तो अवैधरित्या भारतात आला असण्याची शक्यता आहे. मोहम्मद बेकायदेशीरपणे भारतात आल्यानंतर त्याने आपले नाव बदलून विजय दास असं ठेवलं. ते इथे एका हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये काम करायचा.


 



महत्त्वाच्या इतर बातम्या


बेरोजगारीने उपासमार, पॉश एरियातील श्रीमंती नजरेत भरली; मोहम्मदने सैफ अली खानच्या घरी चोरीचा प्लॅन का आखला?