Abhishek Bachchan  Aishwarya Rai :  बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan Birthday) याचा आज वाढदिवस आहे. अभिषेक बच्चन आज आपला 48 वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त अभिषेकला त्याच्या वाढदिवसानिमित्ताने त्याच्या चाहत्यांनी आणि मित्रपरिवाराने सोशल मीडियावर (Socail Media) शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्याशिवाय, वडील अमिताभ बच्चन, बहीण श्वेता बच्चन आणि भाची नव्या नवेली नंदा यांनीदेखील अभिषेक बच्चनला शुभेच्छा दिल्या. मात्र, पत्नी अभिनेत्री ऐश्वर्या रायकडून सोशल मीडियावर  शुभेच्छा देणारी पोस्ट न आल्याने चर्चांना उधाण आले आहे. 

अभिषेक बच्चनची बहीण श्वेता नंदा हिने तिच्या इन्स्टा हँडलवर त्याच्यासोबतचा बालपणीचा फोटो पोस्ट केला आहे. जुन्या फोटोसोबतच त्याने आपल्या धाकट्या भावासाठी एक प्रेमळ चिठ्ठीही लिहिली आहे. बालपणीच्या फोटोमध्ये, भाऊ-बहीण जोडी पलंगावर बसून मिठाईचा आस्वाद घेताना दिसत आहे. फोटोसोबत श्वेताने लिहिले की, 'असे नाही - If you Know, You Know, फक्त तुम्हाला माहीत आहे आणि मला माहीत आहे. आज तुझा मोठा दिवस आहे माझ्या धाकट्या भावा- आशा आहे की तुला गाणे आवडेल. तुझ्यावर खूप प्रेम आहे. 

 

भाची नाव्या आणि अभिताभ बच्चन यांनी दिल्या शुभेच्छा

अभिषेक बच्चनची भाची नाव्या नवेली नंदाने देखील आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आपल्या मामाला शुभेच्छा दिल्या आहेत. नाव्याने मामा अभिषेकचा एक जुना फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये अगस्त्य नंदासोबत छोटी नाव्यादेखील आहे. सर्वांच्याच लाडक्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. अमिताभ बच्चन यांनीदेखील अभिषेक बच्चनला शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

ऐश्वर्याने दिल्या नाहीत शुभेच्छा

सोशल मीडियावर अभिषेकच्या कुटुंबातील सर्वांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत परंतु त्याची पत्नी ऐश्वर्या रायने सायंकाळपर्यंत तरी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत.  अनेक महिन्यांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक वेगळे होणार असल्याच्या बातम्या येत होत्या. दोघांमध्ये विसंवाद झाल्याची चर्चा सुरू होती. ऐश्वर्याने अभिषेकला जाहीरपणे शुभेच्छा न दिल्याने चर्चांना उधाण आले आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :