नवी दिल्ली : क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकरने राजधानी नवी दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आगामी 'सचिन अ बिलियन ड्रीम्स' या सिनेमाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली.

सचिन तेंडुलरकच्या आयुष्यावर आधारित 'सचिन अ बिलियन ड्रीम्स' येत्या 26 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

यावेळी सचिनसोबत पत्नी अंजलीही उपस्थित होती. पंतप्रधानांसोबतच्या भेटीचा फोटो सचिनने ट्विटरवर शेअर केला आहे. 'सचिन अ बिलियन ड्रीम्स'बद्दल पंतप्रधानांना सांगितलं आणि मोदींनी शुभेच्छा दिल्या, असं ट्वीट मास्टरब्लास्टरने केलं आहे.

https://twitter.com/sachin_rt/status/865455681947578368

'जो खेले वही खिले,' हा प्रेरणादायी संदेश पंतप्रधानांनी या भेटीत दिल्याचंही सचिनने सांगितलं. यासाठी त्याने मोदींचे आभारही मानले.

https://twitter.com/sachin_rt/status/865464457157197825

दरम्यान, पंतप्रधान मोदींनीही सचिनसोबतच्या भेटीचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. सचिन तेंडुलकरसोबत चांगला वेळ घालवला. त्याचा जीवन प्रवास आणि कामगिरी 125 कोटी भारतीयांसाठी अभिमानस्पद आणि प्रेरणादायी आहे, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

https://twitter.com/narendramodi/status/865470429049241602

सचिन तेंडुलकर राज्यसभेचा खासदारही आहे. सचिनच्या या सिनेमाचं दिग्दर्शन जेम्स एर्स्किन यांनी केलं आहे. या सिनेमात सचिनसह त्याची पत्नी, मुलगी, वीरेंद्र सहवाग आणि महेंद्र सिंह धोनीही दिसणार आहेत.