Sachin Pilgaonkar: बॉलिवूडच्या जगतातील अनुभवी आणि लोकप्रिय अभिनेते सतीश शाह (Satish Shah) यांच्या निधनाने सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलं. पण त्यांच्या जाण्यानंतर एक वेगळंच प्रकरण चर्चेत आलं आहे. कारण त्यांच्या मृत्यूपूर्वी फक्त दोन तास आधी त्यांनी अभिनेता सचिन पिळगावकरांना (Sachin Pilgaonkar) मेसेज केला होता!ही गोष्ट बाहेर आल्यानंतर सोशल मीडियावर गोंधळ उडाला. काहींनी या घटनेला ‘योगायोग’ म्हटलं, तर काहींनी ट्रोलिंगला सुरुवात केली, “प्रत्येकाच्याच शेवटच्या क्षणी सचिन पिळगावकरांनाच का आठवतं?” असे जोक्स आणि मीम्स व्हायरल झाले. ट्रोल्सना उत्तर देण्यासाठी सचिन पिळगावकर यांनी स्वतःच फेसबुकवर सतीश शाह यांचा शेवटचा मेसेज शेअर केला. त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं “Because of my age, people often think I am mature.” आणि मेसेज पाठवण्याची वेळ होती 12:56 दुपारी म्हणजेच मृत्यूपूर्वी अवघ्या दोन तास आधी.

Continues below advertisement

सचिन यांनी लिहिलं, “हा सतीश शाह यांनी मला काल पाठवलेला शेवटचा मेसेज आहे. त्यांचा आत्मा शांती लाभो.” एवढं लिहिताच लोक शांत झाले आणि सर्वांनी सतीश शाह यांच्या आठवणींना उजाळा दिला.

सचिन पिळगावकर यांनी केला सतीश शाह यांचा आलेला शेवटचा मेसेज 

या ट्रोलिंगला उत्तर देत सचिन पिळगावकर यांनी स्वतः फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत सत्य समोर आणलं. त्यांनी सतीश शाह यांनी पाठवलेला शेवटचा मेसेज दाखवत त्याची वेळ स्पष्ट केली “हा माझा मित्र सतीश शाह यांनी काल दुपारी 12.56 वाजता पाठवलेला शेवटचा मेसेज होता. त्याच्या आत्म्यास शांती लाभो.” या मेसेजवर लिहिलं होतं, “Because of my age, people often think I am mature.” म्हणजेच “माझ्या वयानं लोक मला प्रौढ समजतात.”

Continues below advertisement

12 वाजून 56 मिनिटांनी आलेला तो मेसेज

सतीश शाह यांच्या निधनानंतर दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेते सचिन पिळगावकर यांनी निधनाच्या बातमीनं मोठा धक्का बसला असल्याचा सांगितलं . ते म्हणाले, "  सुप्रिया तीन दिवसांपूर्वी सतीश आणि मधुला भेटून आली होती .सतीश ने कोणतेतरी गाणे ऐकवले होते .त्यावर मधु आणि सुप्रिया नाचल्या होत्या .सतीश आणि मी नेहमी बोलायचो .मेसेज करायचो .त्याचा मला आजच दुपारी 12 वाजून 56 मिनिटांनी त्याचा मेसेज आला होता . त्यावेळी तो पूर्णपणे ठीक होता .पण त्याचा निधनाची अचानक बातमी आली .हे बातमी मुळे मला मोठा धक्का बसला आहे असं सचिन पिळगावकर म्हणाले होते.