Shashi Tharur: बॉलीवूडचा किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan)याने दिग्दर्शनाच्या दुनियेत पाऊल ठेवतात त्याच्या पहिल्याच प्रोजेक्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. आर्यनच्या दिग्दर्शनात तयार झालेली 'The ba**ds of bollywood ' ही सिरीज नेटफ्लिक्स वर प्रदर्शित झाली असून तिचं कौतुक सर्व स्तरांवर होत आहे. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर (Shashi Tharur)यांचं नावही आता आलं आहे. नुकताच थरूर यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत आर्यन खानच्या दिग्दर्शनाचं आणि लेखनाचं भरभरून कौतुक केलं आहे.
हलकंफुलकं काहीतरी पहायला गेलो ..
शशि थरूर यांनी लिहिलं की, “गेल्या दोन दिवसांपासून मला सर्दी आणि खोकला असल्याने मी सर्व कार्यक्रम रद्द केले होते. माझ्या स्टाफने आणि बहीण स्मिता थरूर हिने मला नेटफ्लिक्सवरील काहीतरी हलकंफुलकं पाहायला सांगितलं. मग मी ‘The Ba***ds of Bollywood’ ही सिरीज पाहायला घेतली आणि खरंच हे माझ्या पाहण्यातलं सर्वोत्तम OTT कंटेंट ठरलं. हे म्हणजे #OTT GOLD आहे!”
धाडसी क्राफ्ट, विनोदी व्यंग नेमका लागतो ..
थरूर पुढे म्हणाले, “आर्यन खानचा दिग्दर्शनातील पहिलं दिग्दर्शन द बॅड्स ऑफ बॉलीवूड ' नुकताच पाहिला . आणि आता मला कौतुकासाठी शब्द सापडत नाहीयत . ही सिरिज सुरुवातीला हळूहळू पकड घेते, पण एकदा तुम्ही जोडले गेल्यावर तुम्हाला सोडवत नाही. धारदार लेखन, निडर दिग्दर्शन आणि संपूर्ण बॉलिवूडवर केलेला हा विनोदी व्यंग नेमक्या ठिकाणी लागतो. याची बॉलीवूडला गरज होती .प्रतिभाशाली,कधी विनोदी कधी भावनिक आणि ग्लॅमरच्या पलीकडे नेणारी नम्र नजर केवळ मनोरंजक नाही, तर विचार करायला लावणारं आहे.”
थरूर यांनी आर्यनला शुभेच्छा देत म्हटलं, “सात भागांची ही मालिका एका नव्या लेखकाच्या आगमनाचं पॉवर हाऊस आहे . आर्यन खान, तू खरंच एक ‘स्टोरीटेलिंग पॉवरहाऊस’ आहेस! The Ba*ds of Bollywood ही मालिका अप्रतिम आहे. आणि @iamsrk, एका वडिलाकडून दुसऱ्या वडिलाला सांगतो, तुला तुझ्या मुलाचा अभिमान वाटला पाहिजे!”
आर्यन खानचा पहिला प्रोजेक्ट
ही सिरीज गौरी खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली निर्मित झाली आहे. The Bads of Bollywood ही एक व्यंगात्मक कॉमेडी असून तिच्यात बॉबी देओल, लक्ष्य लालवानी, राघव जुयाल, साहेर बंबा, अन्या सिंग, मनोज पहवा, मनीष चौधरी, मोना सिंग, राजत बेदी, मेहरजान माजदा आणि गौतमी कपूर यांसारखे कलाकार आहेत.
आर्यन खानचं हे पदार्पण केवळ बॉलिवूडसाठीच नव्हे, तर ओटीटी प्रेक्षकांसाठीही एक नवी झलक ठरत आहे. त्याच्या या व्यंगात्मक दृष्टिकोनामुळे बॉलिवूडचं वास्तव आणि ग्लॅमरच्या पडद्यामागचं जग नव्या पद्धतीने उलगडलं आहे.