मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा बायोपिक ‘सचिन ए बिलीयन ड्रीम्स’ या सिनेमाने पहिल्या दिवशी 8.40 कोटींची कमाई केल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा आकडा वाढला आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी या सिनेमाने सर्व भाषांमध्ये मिळून 9.20 कोटींची कमाई करत आतापर्यंत 17.60 कोटींचा गल्ला जमवला आहे.


शुक्रवारी कामकाजाचा दिवस असूनही सिनेमाला चांगले प्रेक्षक मिळाले. मात्र शनिवारी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात हा सिनेमा पाहण्यासाठी सिनेमागृहात गर्दी केली होती. रविवारी हा आकडा आणखी वाढणार आहे.

26 मे रोजी म्हणजे शुक्रवारी हिंदी, मराठी, इंग्रजी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज झाला आहे. भारतात 2400 आणि परदेशात 400 स्क्रीन्सवर हा सिनेमा रिलीज झाला आहे.

संबंधित बातमी : 'सचिन ए बिलीयन ड्रीम्स'ची पहिल्या दिवशी 8.40 कोटींची कमाई