मराठमोळी अंजली पाटील सुपरस्टार रजनिकांतच्या सिनेमात झळकणार
एबीपी माझा वेब टीम | 28 May 2017 02:04 PM (IST)
फोटो सौजन्य : अंजली पाटील ट्विटर अकाऊंट
मुंबई : नाशिकची अंजली पाटील ही मराठमोळी तरुणी सुपस्टार रजनिकांतसोबत काम करणार आहे. 'काल करिकालन' असं या चित्रपटाचं नाव असून, आजपासूनच या सिनेमाच्या चित्रिकरणाला सुरुवात होत आहे. सुपरस्टार रजनीकांतसह काम करण्याची संधी मोजक्या आणि नशीबवान कलाकारानांच मिळते. यापूर्वी राधिका आपटेनं रजनिकांत यांच्यासोबत काम केलं होतं. पण आता ही संधी अंजली पाटीलला मिळाली आहे. अंजलीने स्वतः ट्विट करुन रजनीकांतसोबत काम करत असल्याची खुशखबर तिच्या चाहत्यांना दिली आहे.