मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा बायोपिक 'सचिन ए बिलीयन ड्रीम्स' या सिनेमाने चांगली ओपनिंग मिळवली आहे. या सिनेमाने भारतात सर्व भाषांमध्ये मिळून 8.40 कोटींची कमाई केली आहे.


शुक्रवारी कामकाजाचा दिवस असूनही सिनेमाला चांगले प्रेक्षक मिळाले. त्यामुळे या वीकेंडलाही सिनेमा चांगला गल्ला जमवण्याची शक्यता आहे. 26 मे रोजी म्हणजे शुक्रवारी हिंदी, मराठी, इंग्रजी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज झाला आहे.

https://twitter.com/taran_adarsh/status/868360335153025024

दरम्यान या सिनेमाला टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा बायोपिक धोनी द अनटोल्ड स्टोरी या सिनेमाचा विक्रम मोडता आला नाही. धोनीच्या बायोपिकने पहिल्याच दिवशी 21.30 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. शिवाय हा सिनेमा 2016 या वर्षात पहिल्याच दिवशी एवढी कमाई करणारा दुसरा सिनेमा ठरला होता.

सचिन ए बिलीयन ड्रीम्स भारतात 2400 आणि परदेशात 400 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे.